Saturday, July 25, 2009

rakhi for indian Army


Sunday, 26-07-2009
सरहद्दीवरील जवानांसाठी राख्या रवाना
पिंपरी, २४ जुलै
सुषमा पाटील यांनी महापौर डोके यांच्या हस्ते आज सरहद्दीवरील जवानांना दहा हजार सहा राख्या पाठविल्या.
वेळी मनिषा भोईर, प्रा. राधेश्याम मिश्रा, एस. टी. गायकवाड, एस. डी. मोरे, एस. जी. डुंबरे, ह. भ. प. शशिकला डोके, एम. व्ही. होणगेकर, सलीम शिकलगार उपस्थित होते.
या उपक्रमास पाटील यांना ज्ञानप्रबोधिनी, निगडी व सुबोध विद्यालय, संभाजीनगर, श्रीमती गोदावरी या शाळांनी मोठ्या प्रमाणावर मदत केली. या शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना राखी बनविण्याचे प्रशिक्षण देऊन व भारतीय सेनेच्या जवानांच्या प्रती सन्मान व त्यांना संदेश पत्र लिहिण्याचे मार्गदर्शन करून हजारोंच्या संख्येने संदेश लिहून घेतले आहेत. ती सर्व पत्र राखी सोबतच पाठविण्यात आली आहेत. जवानांना राख्या पाठविण्याचे त्यांचे हे पाचवे वर्ष आहे. राख्या पाठविण्याचा खर्च स्वतः सुषमा पाटील स्वखर्चातून करतात. त्यांचा स्वतःचा मोठा मुलगा भारतीय सेनेत वरिष्ठ पदाधिकारी म्हणून सरहद्दीवर तैनात आहे हे विशेष.